अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा अतिशय जौश ,व उल्लास वातावरणात संपन्न…..
अमळनेर : विक्की जाधव.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव ,अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तर मैदानी स्पर्धा आज तालुका क्रीडासंकुल मैदानावर , अतिशय जोरदार व चुरशीने वातावरणात उत्साहात संपन्न झाल्या.
अमळनेर तालुक्यातील सर्व शाळा, व महाविदयलयातिल १४, १७ व १९ वर्षो आतील मुले व मुलींनी सहभाग घेतला.
या वेळी कार्यक्रमासाठी उद्घाटन व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्यांचे माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिल दादा पाटील , प्रमुख पाहुणे खा.शि मं चे कार्याध्यक्ष व सी ए भाऊसो नीरजजी अग्रवाल , खा.शि.मं चे समन्वय समितीचे चेअरमनन भाऊसो भैय्यासाहेब श्री योगेश मुंदडे , प्रताप काॕलेजचे उपप्राचार्य प्रा. ए के अग्रवाल , डि आर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम ,श्री नरेंद्र घोडपडे , तालुका क्रीडा अध्यक्ष व पर्यवेक्षक श्री.एस पी वाघ सर , क्रीडा समितीचे श्री महेश माळी सर इ मान्यंवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानाची पुजा करुन , श्रीफळ फोडले , स्पर्धेची मशाल प्रज्वलीत करुन केली.स्पर्धेचा लोगो विविध रंगी बिरंगी फुगे आकाशात सोडुन केला.यावेळी जोरदार जल्लोश खेळाडूनी टाळ्या वाजवुन केला.त्यानंतर १०० मी धावण्यांची स्पर्धा प्रमुख पाहुण्यांच्या समोर घेण्यात आली.
आपल्या उद्घाटन भाषनात आमदार दादासाहेब अनिल दादा पाटील मनोगत भाव प्रकट करतांना म्हणाले की सांघीक भावना ,एकात्मता भावना , मन प्रबल सुदृढ सशक्त बनते, शारिरीक चपळता निर्माण होऊन शरीर निरोगी काटक बनते. खेळाडूंनी मेहनत करुन , स्वच्छते कडे लक्ष देण्याबद्दल व मोबाईल पासुन दुर राहण्यांचेही मार्गदर्शन केले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री के आर बाविस्कर , श्री कमलेश मोरे , श्री गोकुळ बोरसे ,श्री जे व्ही बाविस्कर , श्री.बापुराव सांगोरे , श्री प्रीतेश तुरणकर , श्री.नितीन पाटील , श्री सुनिल करंदीकर , श्री मनोज पाटील ,श्री हिरालाल बाविस्कर , श्री विनायक सुर्यवंशी ,श्री दर्शन पाटील, श्री.मयुर बारस्कर श्री सागर चावरिया , , श्री. योगेश पाटील , श्री राज जाधव ,यांनी काम पाहिल व स्पर्धा यशस्वी केल्या.