पी.बी.ए इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वयोगट 17 कॅरम स्पर्धेत चमकदार देदीप्यमान कामगिरी करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261005-WA0864

पी.बी.ए इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वयोगट 17 कॅरम स्पर्धेत चमकदार देदीप्यमान कामगिरी करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी अनेक शालेय स्पर्धेमध्ये दिमाखदार ,चमकदार व उज्वल कामगिरी करीत यश संपादन करीत आहेत. त्याच परंपरेच्या मालिकेला पुढे नेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वय 17 वर्ष कॅरम स्पर्धेमध्ये निर्भेळ सुवर्णमय यश संपादन करीत तालुकास्तरावर विजयश्री प्राप्त केले. सदर मुले व मुली असे दोन वेगवेगळ्या प्रकारात त्यांची निवड जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी झाली असून त्यांनी आपल्या या सुवर्णमय कामगिरीच्या माध्यमातून शाळेच्या ऐतिहासिक कार्य करायच्या अबाधित परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. 17 वर्षे वयोगट मुलांमध्ये श्लोक प्रवीण साळुंखे व देवेश महेंद्र निकुंभ यांनी यश संपादन करीत तालुकास्तरावर ते विजयी स्पर्धक ठरले.

मुली सतरा वर्ष वयोगट विजयश्री प्राप्त तालुकास्तरावर ग्रंथी किशोर पटेल, प्रतीक्षा अमरनाथ हिरे यांची जिल्हास्तरावर कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध बारकावे प्रशिक्षण मार्गदर्शन क्रीडा शिक्षक रोहन मुंदडा, महेश माळी व विनायक सूर्यवंशी या क्रीडा शिक्षकांचे लाभले.

सदर विद्यार्थ्यांना अनमोल सहकार्य सर्वतोपरी पाठबळ देण्याचे कार्य शाळेचे चेअरमन डॉ. श्री.संदेश गुजराथी , मुख्याध्यापक जे. एस. देवरे पर्यवेक्षक महेश माळी, प्रशांत वंजारी, व्हि.पी. बडवे, योगिषा महाजन समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

धन्यवाद.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!