“साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम”

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261006-WA0633

“साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध उपक्रम”

 

अमळनेर : विक्की जाधव. 

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये सेवा संकल्प अभियान अंतर्गत पुढील प्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले . स्वच्छता मोहीम , वृक्षारोपण ,चित्रकला स्पर्धा , वकृत्व स्पर्धा ,व्याख्यान आयोजन, फिट इंडिया योग व ध्यान सत्र,व विद्यार्थी लाभाच्या योजना .दिनांक 5/10 / 26 वार सोमवार रोजी व्याख्यान आयोजन हा उपक्रम राबविण्यात आला .कार्यक्रम प्रसंगी अमळनेर येथील बांधकाम व्यावसायिक व अमळनेर नगरीचे उप -नगराध्यक्ष श्री .माननीय प्रशांत निकम यांना यशस्वी उद्योजक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती .अनिता बोरसे मॅडम यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुणे श्री प्रशांत निकम यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . अनिता बोरसे मॅडम म्हणाल्या प्रत्येक यशस्वी उद्योजका मागे त्यांची मेहनत व त्यांचे श्रम व त्यांची इमानदारी हे गुण असतात . म्हणूनच त्यांचे नाव यशस्वी उद्योजकांमध्ये सन्मानाने घेतले जाते .त्यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला . तुम्ही सुद्धा भविष्यात असेच यशस्वी उद्योजक व्हाल अशी अपेक्षा करते . ते एक यशस्वी राजकारणी असून ते अमळनेर नगरीचे उप-नगराध्यक्ष आहेत . मान्यवरांच्या हस्ते वकृत्व स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला .प्रथम -वैष्णवी पवार 8 वी/ब द्वितीय – स्नेहा शिंदे 8 वी- अ तृतीय – भाविका पाटील 8वी ब उत्तेजनार्थ -हिरल पाटील 8 वी ब प्रमुख पाहुणे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना म्हणाले तुम्ही कुठलेही काम कमी लेखू नका त्या कामांमध्ये स्वतःला झोकून द्या व कामाशी मेहनत इमानदारी व सत्य या तीन गुणांचा ताळमेळ ठेवा मग तुम्ही प्रत्येक व्यवसायात यशस्वी व्हाल . नोकरीचे मागे न धावता स्वतः मालक व्हा व दुसऱ्यांना काम द्या .हीच खरी यशस्वी उद्योजकाची गुरुकिल्ली होय . सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री . आबासो . हेमकांत पाटील, व सचिव दादासाहेब श्री . संदीप घोरपडे व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री . मुकेश पाटील सर व आभार श्री. दिलीप पाटील सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री .देशमुख सर, श्री . साळुंके सर,श्री .महाजन सर, सौ . वैद्य मॅडम,श्रीमती वानखेडे मॅडम व सौ वंजारी मॅडम यांनी प्रयत्न केले .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!