अमळनेर तालुक्याची आतापर्यंतची पावसाची परिस्थिती पाहता, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने मा. उपविभागीय अधिकारी अंमळनेर, यांना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260908-WA0619

अमळनेर तालुक्याची आतापर्यंतची पावसाची परिस्थिती पाहता, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने मा. उपविभागीय अधिकारी अंमळनेर, यांना निवेदन

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्याची आतापर्यंतची पावसाची परिस्थिती पाहता, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने मा. उपविभागीय अधिकारी अंमळनेर, यांना निवेदन दिले. त्यात सर्वप्रथम तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुक्यातील पावसाची, पिकांची, विम्याची, शेती उत्पादनाची परिस्थिती समजावून सांगितली.व तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अनुदान किंवा आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. निवेदनात

यंदा मान्सून उशिरा आल्याने, खरिपाच्या पेरण्या उशिराने झाल्या आहेत. आणि आता अमळनेर तालुक्यातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पावसाने फार मोठी ओढ दिलेली आहे. जेमतेम स्थितीत असलेली खरीप पिके आता गेल्यात जमा आहेत.

आणि त्यातही हवामान विभागाच्या पावसा संबंधीच्या अंदाज एवढा आशादायक नाही.

सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांची पिके तग धरून उभी आहेत परंतु तालुक्यात अशा शेतकऱ्यांची संख्या केवळ बोटावर मोजण्या इतकी आहे. अशा परिस्थितीत पावसावर अवलंबून असणारी कोरडवाहू पिके पूर्णतः धोक्यात आलेली आहेत. संपूर्ण अंमळनेर तालुक्यात 10 ते 12 फूट वाढणारा मका 5 ते 6 फूट वाढून, वित भर लांबीचं कणीस काढून उभा आहे. त्या वितभर लांबीच्या भूनक्याला दाणेही भरतात की नाही? याची शंकाच आहे. मुगाच्या पिकाला देखील धक्का बसला आहे. अमळनेरच्या पश्चिम भागात बाजरा पिकाचे उत्पन्न जेमतेम येण्याची शक्यता आहे. तर उत्तर- पूर्व कोपऱ्यात तापी नदी मुळे, सिंचन व्यवस्था बऱ्यापैकी असली तरी कपाशी पिकावर आतापासून बोंड आळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत असल्याने, कपाशीचे उत्पन्न 70 ते 80 टक्के घटण्याची शक्यता आहे. तालुक्यात अशीच परिस्थिती ज्वारी आणि सोयाबीन पिकाची देखील आहे.

पावसाच्या खंडामुळे 25% पीक विमा, अग्रीम भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली असती, परंतु पिक विमा कंपनीने पावसाच्या खंडाचा निकष (टिगर) काढून, त्या ऐवजी पिकाच्या उत्पन्नावर आधारित निकष ठेवला आहे. तसेच यावर्षी फारच कमी शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे. त्याला बँका, विमा काढण्याचे पोर्टल, पिक विम्यातील निकषात बदल, असे अनेक घटक कारणीभूत आहेत.

अमळनेर तालुक्यातील पावसाबाबत विचार केला तर 31 ऑगस्ट 2026 पर्यन्त, अंमळनेर, शिरुड, पातोंडा, मारवड, नगाव, अमळगाव या मंडळात प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण 70 ते 89. 30 टक्के एवढे आहे, तर भरवस व वावडे मंडळात अनुक्रमे 130.20,117.40 टक्के आहे.

तालुक्यात पावसाचे वितरण असमान राहिल्याने पावसाची आकडेवारी थोडीफार समाधानकारक वाटत असली तरी, त्याचा योग्य तो फायदा पिकांना झालेला नाही.

अमळनेर तालुक्यात सरासरी474.30 मि.मी टक्के पाऊस झालेला असला, तरी लहान बंधारे, तलाव कोरडे पडलेले आहेत. पुढे पिण्याच्या पाण्याचे देखील गावोगावी हाल होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पेरणीसाठी खते, बी- बियाणे, किटकनाशके, शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या हातातील पैसा पूर्ण खर्च झाला असून, रब्बी हंगामासाठी देखील शेतीवर खर्च करावा लागणार आहे. आणि महागाई पूर्णतः उच्चांकावर गेलेली आहे.

पावसाची आकडेवारी किती फायदेशीर दिसत असली, नसली तरी शेती उत्पादनात मात्र मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तत्त्व बाजूला ठेवून तत्त्वाची व्यवहाराशी सांगड घालणं संबंधितांचे काम आहे. पाऊस पडण्याची पावसाची आकडेवारी न पाहता पिकांना त्या पावसाचा फायदा किती झाला, त्याच्या उत्पादनावर परिणाम काय झाला? पाऊस जमिनीत किती मुरला? याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी वावराच्या बांधावरून जाऊन अंदाज घेणे गरजेचे आहे. तेव्हाच सत्य ध्यानात येईल. त्या सत्यानुसार शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी आर्थिक मदत मिळावी, अशी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!