ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ पळवून मध्यवर्ती शहरात भूमिपूजन!

अपनी भाषा में पढ़े! Translate

ताडेपुराचे ‘नमो गार्डन’ पळवून मध्यवर्ती शहरात भूमिपूजन!

 

पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरातील नागरिकांचा संताप; “जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!”  नगरसेविका शोभाबाई गढरे

 

अमळनेर : विक्की जाधव.

ताडेपुरा परिसरासाठी प्रस्तावित असलेले ‘नमो गार्डन’ मध्यवर्ती शहरात नेऊन थाटात भूमिपूजन करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या ताडेपुरा येथे गार्डन होऊ नये निर्णयाला सर्वप्रथम सत्ताधाऱ्यांनी विरोध केला होता. तसेच प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी युवक शहरध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्यासह नागरिकांनी ताडेपुराच्या विकासासाठी आवाज उठविला होता.

आता पैलाड, शनीपेठ, सिंधी कॉलनी, ताडेपुरा आणि परिसरातील नागरिकांचा सवाल आहे “ताडेपुराचा विकास पळवून मध्यवर्ती शहरात नेण्याचा निर्णय घेतलाच कुणी? या निर्णयाचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारल्याशिवाय जनता शांत बसणार नाही,” असा इशारा नगरसेविका शोभाबाई गढरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!