पी. बी. ए. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन व गोकुळ जन्माष्टमी संयुक्त स्वरूपात उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

motion_photo_3568830103800880363

पी. बी. ए. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन व गोकुळ जन्माष्टमी संयुक्त स्वरूपात उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न.

 

अमळनेर : विक्की जाधव.

पी. बी. ए. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षणतज्ञ भारत देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करीत असतो या महान व पवित्र दिवसाचे औचित्य साधत हा दिवस उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात साजरा करून विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आत्मसमर्पित देश भावना व कार्याबद्दल त्यांना अवगत करून येणाऱ्या काळात अधिका अधिक उत्कृष्ट कार्य आपल्याद्वारे व्हावे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. सकाळच्या मंगल प्रहरी या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. महान विभूती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व मदर टेरेसा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन शुभारंभ करण्यात आला, आज मोठे विद्यार्थी हे शिक्षक भूमिकेमध्ये शिक्षकाची भूमिका निभवीत होते शिक्षकाचे आत्मसर्पण भावविश्व काय असते या भाव विश्वाची अनुभूती या कार्यातून अनुभव स्वरूपात त्यांना प्राप्त झाली. त्याच सोबत शिक्षक दिनाचे पवित्र औचित्य साधीत त्यांची करण्याचे कार्य महती विषद शब्दातून अभिव्यक्त करण्याचे कार्य सौ एस. एस. देसले यांनी केले तसेच मदर तेरेसा यांचे अतुलनीय समाज उपयोगी पवित्र कार्याचे वर्णन शाळेचे शिक्षक श्री. प्रशांत वंजारी व सौ. व्ही. डी. पाटील यांनी अलंकारिक वाणीत मनोगत भाव प्रकट केले. त्याच सोबत एक दिवस अगोदर शाळेमध्ये गोकुळ जन्माष्टमी हा उत्सव सण साजरा करण्यात आला. मानवी मनोरे रचित विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या दहीहंडी फोडीत जल्लोष करीत आला रे आला गोविंदा आला घोषवाक्य म्हणत हा मंगलमय उत्सव सण साजरा केला.

सदर कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन डॉक्टर संदेश जी गुजराती मुख्याध्यापक श्री. जे. एस देवरे पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका कुमारी मीनाक्षी बारी व्हि. पि. बडवे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, व्ही. जी. बोरवले, वृषाली बोरसे, विद्या कुळकर्णी, स्वाती साळुंखे, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी, रोहन मुंदडा, समस्त शिक्षक रुंद व शिक्षकेच्या कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!