अमळनेर- खरीप हंगाम 2022 खतपुरवठा नियोजन सभा संपन्न
अमळनेर तालुक्यातील किरकोळ व घाऊक अनुदानित त विक्रेते यांची सभा पंचायत समिती सभागृहात दिनांक १६ रोजी खरीप हंगाम 2022 खत नियोजनासाठी कोविड १९ नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आली. सदर सभेस मा. मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव तसेच मा. कृषी अधिकारी पंचायत समिती , अमळनेर उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
ई पॉस खत साठा याबाबत माहिती देण्यात आली तसेच शेतकरी बांधवांनी खत भरून ठेवणे कमी रा.खत विक्रेत्याकडून व कृषी विभाग काढून आव्हान करण्यात आले .तसेच
ई पांस मशील मोबाईल डेस्कटॉप व्हर्जन चा वापर करून खत विक्री करणे संदर्भातील माहिती देण्यात आली.
शिवाय जमीन सुपीकता, निर्देशांक व जमीन आरोग्य पत्रिका आधारित खत वापर कसा करावा या बाबत योग्य पद्धतीने सांगण्यात आले
कृपक अप नुसार खत वापर नियोजन व वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
पिक निहाय खत मागणी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी,पंचायत समिती, अमळनेर
मा. मोहीम अधिकारीजिल्हा परिषद जळगांव. मा. तालुका कृषी अधिकारी, अमळनेर,मा. अध्यक्ष, अमळनेर तालुका कृषी निविष्ठा विक्रेते संघटना,
तालुका कृषी अधिकारी, अमळनेर
किरकोळ व घाऊक अनुदानित खत विक्रेते अमळनेर तालुका जिल्हा जळगाव उपस्थित होते.