June 30, 2025 2:03 pm

अमळनेर – तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची शेतातच गळफास घेऊन …

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर – तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची शेतातच गळफास घेऊन …

अमळनेर – तालुक्यातील कन्हेरे येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र गोरख पाटील वय ५८ यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना दि १५ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली असुन अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत सविस्तर असे की मयत राजेंद्र गोरख पाटील व त्यांचे वडील एकत्र राहत होते मात्र वडील मयत झाल्यानंतर त्यांच्या नावाचे विविध कार्यकारी सोसायटी चे सुमारे १.५० लाख रुपये कर्ज थकीत होते. शेतात गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न कमी व लाईटबिल सुमारे ५० हजार तसेच हात उसनवारी सुमारे २ लाख रुपये असे सुमारे ४ लाख कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,चार भाऊ असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!