June 30, 2025 11:34 am

शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सारथी संस्था कडून 15 मार्च ऐवजी 31मार्च मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार सारथी संस्थेचा लाभ…

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सारथी संस्था कडून 15 मार्च ऐवजी 31मार्च मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार सारथी संस्थेचा लाभ…

खळेगाव प्रतिनिधी- याबाबत सविस्तर माहिती अशी की,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या वतीने 2021 या वर्षी पी.एच.डी. साठी पात्रता परीक्षा (PET)घेण्यात आली होती.सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सध्या विद्यापीठामध्ये सुरू आहे परंतु काही विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर मिळाले नव्हते .ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात अश्या संशोधक मराठा विद्यार्थ्यांना सारथी संस्था पुणे यांच्या मार्फत संशोधन करण्यासाठी फेलोशिप दिली जाते आणि त्या फेलोशिप साठी नाव नोंदणीचा अंतिम दिनांक 15 मार्च 2022 होता परंतु काही संशोधक विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर प्राप्त झाले नव्हते आणि त्यांची एक चांगली संधी हुकत होती या मुळे अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभही घेऊ शकत नव्हते. या यासाठी न्याय मिळावा म्हणून मराठा आंदोलन श्री मनोज रंगे पाटील यांना विद्यार्थ्यांनी आपली सर्व हकीगत सांगून तात्काळ यासाठी आपण प्रयत्न करून मराठा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती केली असता श्री मनोज जरांगे पाटील यांना संपर्क केला आणि या नाव नोंदणी साठी 15 मार्च ऐवजी काही दिवस मुदत वाढवून मिळावी अशी विनंती केली श्री मनोज जारांगे पाटील यांनी क्षणाचा ही विलंब न करता थेट सारथी संस्थेशी संपर्क केला आणि विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले व सारथी च्या नाव नोंदणी साठी 15 मार्च ऐवजी आता 31 मार्च 2022 ही अंतिम दिनांक असणार आहे तसे घोषणा पत्र ही सारथी संस्थेकडून जाहीर केले आहे .त्यांच्या या कार्यामुळे मराठा संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आणि फेलोशिप मिळवण्याच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत.या विद्यार्थ्यांनी सारथी संस्था पुणे व शिवश्री विजयजी काकडे साहेब , शिवश्री मनोज जरांगे पाटील (संस्थापक अध्यक्ष शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य) श्री मनोज शेंबडे पाटील यांचे अमोल आहेर अक्षय जगताप दीपक पवार कृष्णा शेडगे सुरेश ढेरे रेखा पीठ सुनील नरके योगेश काळकुटे चंद्रकांत तौर शंकर गलधर सह विद्यार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आभार व्यक्त केले .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!