शिरपूर: यशवंत प्राथमिक विद्यालय शिरपूर येथे आज जागतिक महिला दिनी विद्यार्थ्यांचे योगवर्ग घेण्यात आले. त्या प्रसंगी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ नलिनी राठी मॅम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात योगा प्राणायाम व मेडिटेशन या गोष्टींचे किती महत्व आहे हे छान सोप्या भाषेत समजावून सांगितले. या अनुषंगाने न्युयॉर्क युनिव्हर्सिटी तून योगाचे शिक्षण घेतलेल्या वेलनेस इंन्स्ट्रक्टर व योगा टिचर मोनाली सोनी यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत मजेने करता येतील असे प्राणायाम व योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यांनी यशवंत स्कूल च्या अल्फाबेटिकची योगासने हा एक योगासनांचा नविन व सर्वांत सुंदर व्यायाम प्रकार विद्यार्थ्यांना शिकवला. तसेच हार्ट ब्रिदींग, कॅंडल ब्रिदींग, बी ब्रिदींग, बलून ब्रिदींग असे मजेशीर प्राणायाम प्रकारही विद्यार्थ्यांना शिकवले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या आजचा विद्यार्थी बराच वेळ टिव्ही , मोबाईल स्क्रीन च्या संपर्कात असतो. त्यासाठी त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे. योग वर्गास विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमास लिनेस क्लबच्या सदस्या सौ. वंदना भंडारी , नीता शिंपी या देखील उपस्थित होत्या . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री कुलकर्णी यांनी या समाजसेवी व कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करुन मनापासून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत शाळेच्या शिक्षिका अनिता पाटील, प्रतिभा बाविस्कर वैशाली मोरे सुवर्णा महाले चेतना चव्हाण मनाली पोतदार जाग्रुती गरूड वरदा वैद्य यांनी परिश्रम घेतले.