करमाळा प्रतिनिधी :- युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड यांचे शिवसेना पक्षाप्रती असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून त्यांना पुढील काळात पक्ष कार्य करताना अडचणी येणार नाहीत याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य युवा सेना सह सचिव अक्षय डोबळे यांनी करमाळा येथील कार्यक्रमात केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन किल्ला विभाग, जुन्या कोर्टासमोर, करमाळा येथे केले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर युवा नेते पृथ्वीराज पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, पंचायत समिती माजी सभापती शेखर गाडे, भरत आवताडे, डॉ. निलेश मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे व युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असून आपल्यासारख्या नेत्याचे पाठबळ पाठीशी असल्यास आणखी पक्ष कार्य करताना प्रेरणा मिळत आहे. यापुढेही सामाजिक उपक्रम राबवून ठाकरे सरकारचे कामे घराघरात पोहचविणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यासह भिगवण, इंदापूर, श्रीगोंदा, बार्शी, कुर्डुवाडी इ. ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना उपजिल्हा प्रमुख मयूर यादव, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, करण काळे यांचेसह युवा सेनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली