भिगवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा गंभीर आरोप – “निलंबनामुळे मानसिक त्रास, भविष्यातील जीवितहानीस जबाबदार वरिष्ठ”

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-31 at 6.04.02 PM

भिगवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा गंभीर आरोप – “निलंबनामुळे मानसिक त्रास, भविष्यातील जीवितहानीस जबाबदार वरिष्ठ”

(निलेश गायकवाड)

भिगवण, बारामती :
ग्रामीण रुग्णालय भिगवणच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या एका संदेशामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील डॉ. अनिकेत लोखंडे यांनी आपल्यावरील निलंबनाच्या कारवाईवरून तीव्र नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आज दुपारी 2:19 वाजता “ग्रामीण रुग्णालय भिगवण” या ग्रुपवर डॉ. लोखंडे यांनी लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की,

> “माझ्याविरुद्ध करण्यात आलेल्या निलंबनाच्या कार्यवाहीमुळे माझ्या सेवाप्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर गंभीर मानसिक, सामाजिक व आर्थिक परिणाम झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मी अत्यंत मानसिक तणावाखाली असून माझ्या आरोग्यावर व कौटुंबिक जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत.”

आरोप काय?
डॉ. लोखंडे यांनी पुढे लिहिले की, या निलंबनामुळे “भविष्यात होणाऱ्या जीवितहानीसाठी डॉ. सचिन विभुते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने हे जबाबदार असतील.”

हा मेसेज डॉ. अनिकेत लोखंडे यांच्या नावाने आला असून ग्रुपवर शेअर केला होता.

प्रशासन काय म्हणते?
निलंबन नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आले, याबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

तसेच डॉ. सचिन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्पष्ट पणे सांगण्यात आले की आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी चुकीचं टाकले आहे.

या संदेशामुळे भिगवण परिसरात चर्चेला उधाण आले असून आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!