भिगवण महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
(निलेश गायकवाड)
भिगवण, दि. १ ऑगस्ट :
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, भिगवण येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
विचारांचा जागर
प्रास्ताविकात डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, लोककला आणि कष्टकरी समाजाच्या प्रबोधनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. आजच्या काळात त्यांचे विचार अधिक प्रासंगिक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. धनाजी मत्रे आणि डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊंच्या परिवर्तनवादी लेखनाचा आणि सामाजिक क्रांतीतील योगदानाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. तानाजी मगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच समाजासाठी कार्य करावे” असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. पद्माकर गाडेकर, डॉ. अनिल बनसोडे, प्रा. रोहन व्यवहारे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश मोरे यांनी केले तर आभार प्रा. सारिका पाटील यांनी मानले.
देशभक्ती आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.