लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तांदुळवाडी येथे उत्साहात साजरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-02 at 8.52.00 PM

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तांदुळवाडी येथे उत्साहात साजरी.
माढा / प्रतिनिधी: -अजिनाथ कनिचे
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तांदुळवाडी येथे मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.जिल्हा परिषद शाळेतील कार्तिक अनपट,राजनंदिनी अनपट,मंदार गवळी,संचिता लंकेश्वर, वैष्णवी जाधव,अनुष्का गवळी,जान्वी गायकवाड या विद्यार्थ्यांनी भाषणं केली.

WhatsApp Image 2026-08-02 at 8.52.20 PM

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शांतीलाल गवळी,गणेश परबत,अजिनाथ परबत व सरपंच रणजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणांतून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य,शाहिरी आणि गौरवशाली सामाजिक कार्याचा आढावा घेतला. समाजातील वंचित,शोषित,पीडित आणि कष्टकरी घटकांच्या जीवनाला आपल्या धारदार लेखणीतून आवाज देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.त्यांच्या समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहनही करत यावेळी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ,महिला, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मंडळांच्या वतीने ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.
यावेळी ग्रामविकास अधिकारी रमाकांत केवटे, राजाभाऊ शिंदे,मा.चेअरमन अतुल गवळी,उद्योजक नागनाथ जाधव,अक्षय परबत,विपुल भोसले,तानाजी कदम,बापुराव कदम,नागनाथ गायकवाड,सचिन गवळी,हनुमंत कदम,नवनाथ जाधव,रणजित कदम,अभिषेक माने,विजय कदम,अभिषेक कदम,मिथुन कदम,अक्षय कदम, संतोष कदम,गणेश कदम,जीवन कदम,आदर्श कांबळे,सचिन कदम,नितीन कदम,विकास कदम,मंगेश कदम सह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-08-02 at 8.52.19 PM

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!