सीमा काळंगे बनल्या सराफ सुवर्णकार समितीच्या महिला प्रदेशाध्यक्षा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-01 at 8.09.05 PM

सीमा काळंगे बनल्या सराफ सुवर्णकार समितीच्या महिला प्रदेशाध्यक्षा

(निलेश गायकवाड)

भिगवण, प्रतिनिधी :
सराफ महाराष्ट्र सुवर्णकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी भिगवण शहरातील ज्येष्ठ सराफ व्यावसायिका सौ. सीमा अनिल काळंगे यांची निवड करण्यात आली आहे.

समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. उमेश बुऱ्हाडे यांच्या आदेशानुसार आणि राज्य उपाध्यक्ष श्री. सुजीत जगताप तसेच राज्य कार्याध्यक्ष श्री. शशिकांत दीक्षित यांच्या शिफारशीवरून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

जबाबदारी आणि उद्देश
सराफ सुवर्णकार समाजातील महिलांच्या समस्या सोडवणे, त्यांना संघटित करणे आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे. महिलांसाठी न्याय मिळवून देणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख ध्येय राहणार आहे.

अभिनंदनाचा वर्षाव
सीमा काळंगे यांच्या या निवडीबद्दल राज्याचे कायदेविषयक सल्लागार प्रमुख अॅड. किरण कावळे, राज्य महासचिव श्री. गणेश टाक, राज्य सचिव श्री. गणेश बनछोड तसेच सर्व कोअर कमिटी सदस्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सराफ सुवर्णकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भिगवण शहरातील एका महिलेने राज्यस्तरावर मानाचे पद मिळवल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!