खडकीतील बाँबे इंजिनिअर ग्रुपमध्ये १० ते १२ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळावा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-31 at 1.27.07 PM

खडकीतील बाँबे इंजिनिअर ग्रुपमध्ये १० ते १२ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळावा

पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्समन – ८ वी व १० वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) या पदांसाठी पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

भरतीच्या वेळापत्रकानुसार ३१ जुलै २०२६ रोजी खेळाडूंची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. १० ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्गासाठी भरती होईल. ११ ऑगस्ट रोजी शीख (मजहबी व रामदासी), एम अँड आर तसेच मुस्लिम प्रवर्गातील अग्निवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर (स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट), अग्निवीर (ट्रेड्समन – ८ वी व १० वी उत्तीर्ण) आणि विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. १२ ऑगस्ट रोजी अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) भरती आयोजित करण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मापन, कागदपत्रांची पडताळणी आणि संगणक नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी संबंधित दिवशी सकाळी ५ ते ८ या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे उपस्थित राहणे आवश्यक असून, सकाळी ८ नंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) भरतीसाठी फुटबॉल, पोहणे, हॉकी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारांतील पात्र खेळाडूंना संधी उपलब्ध आहे.

भरती प्रक्रियेबाबत पात्रता, सेवा अटी व इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.), पुणे यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!