भादलवाडी : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 67 वर्षीय आरोपीला अटक

अपनी भाषा में पढ़े! Translate

भादलवाडी : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 67 वर्षीय आरोपीला अटक

(निलेश गायकवाड )

इंदापूर, 31 जुलै : भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिगवन पोलिसांनी 67 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

भिगवन पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 192/2026 B.N.S. कलम 64(2)(फ)(आय)(के), 65(1), 74, पोक्सो कलम 4,6,8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24/07/2026 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 वाजेच्या दरम्यान मौजे भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे ही घटना घडली.

फिर्यादी यांच्या सख्ख्या चुलत्याने म्हणजेच आरोपी शिवाजी चंद्रकांत दगाने, वय 67 वर्षे, रा. भादलवाडी, ता. इंदापूर यांनी फिर्यादीची मतीमंद अल्पवयीन मुलगी, वय 14 वर्षे, 5 महिने, 21 दिवस हिला घरात एकटे पाहून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. मुलगी मतीमंद असल्याची माहिती असूनही आरोपीने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तक्रार आणि अटक
या प्रकरणी फिर्यादी मंगल भोलेनाथ तुपे, वय 40 वर्षे, रा. भादलवाडी, सध्या रा. हडपसर, पुणे यांनी दि. 30/07/2026 रोजी भिगवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच दिवशी रात्री 9:06 वाजता आरोपी शिवाजी दगाने याला अटक केली.

पुढील तपास
या गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे हे करत आहेत.

टीप: पिडीत अल्पवयीन असल्याने तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

या घटनेमुळे भादलवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!