बारामतीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास होंडा महालक्ष्मी शोरूम, कसबा, बारामती समोरील माळेगाव रोडलगत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अंगात समोरील बाजूस “समस्त भोईराज दहीहंडी संघ” असे छापलेली बनियन असून त्यावर श्री हनुमानजी यांचे मोठे चित्र आहे. तसेच काळ्या-पांढऱ्या चौकटीचा शर्ट, गडद रंगाची पॅन्ट आणि डाव्या हातात स्टील पट्ट्याचे मनगटी घड्याळ आहे.
सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती संबंधित कुटुंबापर्यंत पोहोचण्यास तसेच पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपर्क : बारामती शहर पोलीस स्टेशन
फोन : ९४०५४ ८८२१९
या अनोळखी व्यक्तीची ओळख पटावी यासाठी नागरिकांनी हे आवाहन जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
