धुळे : शहरातील गोळीबार टेकडी परिसरात अल्पवयीन मुलीने कुरपणे होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत जीवन संपवले. या घटनेवर तीव्र भावना व्यक्त करीत आज धोबी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. त्या निष्पाप मुलीला आत्महत्येला कारणीभूत असलेल्या नराधमांवर कारवाई करून सदर खटला विशेष जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन कु. जानवी जितेंद्र ठाकरे सोबत नुकत्याच घडलेल्या एक अत्यंत संतापजनक दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेकडे महाराष्ट्र परिट सेवा मंडळाच्या वतीने व धुळे तमाम समाज बांधवांच्या वतीने जाहीर लक्ष वेधु इच्छितो एका अवघ्या १५ वर्षाच्या निष्पाप अल्पवयीन मुलीच्या अत्यंत क्रूरपणे मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून, ती आमच्या समाजाच्या इज्जत
व माणुसकीवर महीला सुरक्षिततेवर झालेला अत्यंत मोठा आघात आहे. दुसऱ्या जातीच्या मुलाने केलेल्या सततच्या छळामुळे या लहान मुलीला आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी बाब आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सदर घटना समजताच धुळे शहरातील स्थानिक कार्यकर्ते संजयभाऊ वाल्हे व दीपक वाघ यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धडक देवून या गुन्ह्याबद्दल सखोल चौकशीची मागणी केली व मुख्य गुन्हेगारास अटक करण्यास पोलीसांना भाग पाडले. परंतु केवळ जुजबी अटक करणे ही या गंभीर प्रकरणाची सांगता असू शकत नाही. आज संपुर्ण परिट समाज अत्यंत आक्रमक भुमीकेत असून निष्पाप लेकीला पुर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. दोषींवर अत्यंत कडक कलमान्वये कारवाई संबधित नरार्थकामावर कायदयातील कठोर कलमांचा वापर करून गुन्हे नोंदविले जावेत. तपास यंत्रणेने कोणताही सैलपणा नदाखवता तपास पूर्ण करावा आणि या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे. विशेष जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा.
अन्यथा संपूर्णमहाराष्ट्रात धोबी समाज आंदोलन पुकारेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र परिट सेवा मंडळ व धोबी समाजाचे पंडीत जगदाळे, संजय वाल्हे, एकनाथराव बोरसे, सुनिल सपकाळ,अरुण धोबी शिरपुर, अनिल काकुळदे, अॅड. योगेश खैरनार, जितेंद्र पवार, भोला सगरे, कृष्णा शिंदे, अमोल गायकवाड, संजय गवळी, गुलाब सोनवणे, शैलेश पवार, डॉ. प्रा. रजनीताई लुंगसे आदी उपस्थित होते.