प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारगाव येथे रोटरी क्लब आणि सायकल क्लबच्या वतीने वृक्षारोपण संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-10 at 10.53.15 AM

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारगाव येथे रोटरी क्लब आणि सायकल क्लबच्या वतीने वृक्षारोपण संपन्न.

(निलेश गायकवाड)

पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने, रोटरी क्लब ऑफ भिगवण आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारगाव (आयुष्मान आरोग्य मंदिर) येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता, जास्तीत जास्त झाडे लावणे आणि ती जगवणे ही काळाची गरज बनली आहे. या भावनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता या लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन आणि जतन करण्याची जबाबदारीही सदस्यांनी घेतली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. “प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे,” असा संदेश रोटरी क्लब आणि सायकल क्लबच्या वतीने यावेळी देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील या हरित उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या स्तुत्य उपक्रमाप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ, उपाध्यक्ष संजय चौधरी, खजिनदार मयुरेश रायसोनी, निखिल बोगावत, नामदेव कुदळे, संतोष सवाने, कुलदीपक ननवरे, औदुंबर हुलगे, कुंडलिक धुमाळ, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती व्यवहारे, बाबासाहेब मोरे, स्वाती लोंढे, वैशाली मोरे, विजय भोई, सरपंच स्वप्निल लोंढे, ग्राम पंचायत अधिकारी रंजना हंगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रत्यक्ष श्रमदान करत वृक्षारोपण यशस्वी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!