राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार भिगवण येथील सामाजिक कार्यकर्त्या,हृदय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ मेघाना शेलार यांना जाहीर
(निलेश गायकवाड)
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान यांच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रीय आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार आपल्या भिगवण येथील सामाजिक कार्यकर्त्या,हृदय फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ मेघना सुनील शेलार यांना जाहीर झाला. आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री देवा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली दिला जाणारा हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार भिगवण गावच्या एका सर्वसामान्य महिलेचा बहुमान, कर्तृत्व आणि त्याची समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पुरस्कार भिगवण गावाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेणारा आणि भिगवन च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा पुरस्कार नक्कीच आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भिगवण मधील सर्व महिला भगिनींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सौ मेघना शेलार यांनी महिलांसाठी पाच वर्षांपूर्वी हृदय फाउंडेशन सुरू केले आणि हृदय फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. हृदया उद्योजिका ग्रुप च्या संचालिका असलेल्या मेघाताई यांनी हृदया उद्योजिका ग्रुपच्या माध्यमातून भिगवण आणि पंचक्रोशीतील व्यावसायिक कर्तृत्ववान तसेच गृहिणींना, गरजू महिलांना एक स्वयंरोजगार निर्मिती माध्यम उपलब्ध करून देत एक वेगळाच सामाजिक आदर्श निर्माण केला. नेहमीच सामाजिक एकोपा जतन करत महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हे फक्त कागदोपत्रीच नसून महिलेला स्वतः आत्मविश्वासाने उभ राहणे स्वतःला सिद्ध करणे खूप गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात प्रत्येक महिलेने स्वतःपासून करावी हे मेघाताईंनी वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमधून दाखवून दिले.
आपला संघर्ष नेहमी दुसऱ्यासाठी प्रेरणा असावा असं मानणाऱ्या मेघा ताई..!