चौबारी ग्रामपंचायतीतून १ ते ३३ क्रमाकांचे नमुने गायब; तत्कालीन ग्रामसेवक चार्ज सोडेना !

अपनी भाषा में पढ़े! Translate

चौबारी ग्रामपंचायतीतून १ ते ३३ क्रमाकांचे नमुने गायब; तत्कालीन ग्रामसेवक चार्ज सोडेना !

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील चौबारी ग्रामपंचायतीत नवीन ग्रामपंचायत अधिकारी म्हणून बदलीने आलेले वासुदेव हरिभाऊ मारवडकर यांना ग्रामपंचायत कार्यालयातून १ ते ३३ क्रमांकाचे नमुने गायब आढळून आले असून त्यांना आजपर्यंत अधिकृत चार्जही मिळालेला नाही. यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत झाले असून ग्रामस्थांना दाखले, उतारे आणि जन्म-मृत्यू नोंदणीसारख्या अत्यावश्यक सेवा मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी मारवडकर यांनी मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडे लेखी अहवाल सादर केला आहे.त्या अहवालानुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार पूर्वीचे ग्रामपंचायत अधिकारी नितीन मराठे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मारवडकर यांची नेमणूक झाली. मात्र, ५ जानेवारी २०२६ रोजी विस्तार अधिकारी कठडे अण्णा यांच्या उपस्थितीत कार्यालयातील कपाट उघडल्यावर १ ते ३३ क्रमांकाचे नमुने पूर्णतः गायब असल्याचे आढळले.यानंतर विस्तार अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यालयास नवीन कुलूप लावण्यात आले आणि नवीन दप्तर सुरू करून कामकाज हाती घेण्यात आले. त्यानुसार १२ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेचे आयोजन करून बँक खात्यांवरील सह्या बदलण्यात आल्या.

परंतु मागील ८ ते १० वर्षांपासून नमुना क्र. ९ (दाखले नोंदवही) उपलब्ध नसल्याचे आणि नमुना क्र. ८ व जन्म-मृत्यू रजिस्टर गायब असल्याने नागरिकांना दाखले देणे अशक्य झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना प्रमाणपत्रे व इतर सरकारी सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत.ग्रामपंचायत अधिकारी मारवडकर यांनी या सर्व प्रकाराबाबत लक्ष वेधत, संबंधित नमुने व नोंदवही तत्काळ उपलब्ध करून देण्याची आणि पूर्ण चार्ज हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज सुरळीत करण्यासाठी तातडीने आदेश देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनीही व्यक्त केली आहे.

चौबारीचे तत्कालीन ग्रामसेवक नितीन मराठे यांची इतरत्र बदली करण्यात आलेली आहे. मात्र त्यांनी अद्यापपावेतो ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दप्तर नव्या ग्रामसेवकांकडे हस्तांतर केलेले नाही. तोंडी तसेच लेखी स्वरुपात मागणी करण्यात आली आहे, तरीही पुर्तता केली नाही. याबाबत लवकरच त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाणार आहे.

-एन. आर. पाटील, गटविकास अधिकारी, पं. स. अमळनेर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!