डांगर गावाजवळ गाडी थांबवून थरार! ओव्हरटेकच्या कारणावरून कार अडवून दहशत

अपनी भाषा में पढ़े! Translate

डांगर गावाजवळ गाडी थांबवून थरार! ओव्हरटेकच्या कारणावरून कार अडवून दहशत.

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील डांगर गावाजवळ ओव्हरटेकच्या किरकोळ कारणावरून संतापजनक प्रकार घडल्याची घटना 2 दिवसापूर्वीचं समोर आली आहे. “रोड तुझ्या बापाचा आहे का?” असा दम देत ३ ते ४ इसमांनी ट्रॅक्टर आडवे लावून कारचालकाची गाडी जबरदस्तीने थांबवली.

त्यानंतर मोबाईलमध्ये फोटो काढत धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती अधिक चिघळत गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला आणि दगडफेकीत कारचे नुकसान करण्यात आले. या गोंधळात २३ ग्रॅमची सोन्याची चैन तुटून गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.


चौघांविरोधात तक्रार; पोलिस तपास सुरू..
या प्रकरणी शुभम सुनील पाटील, मुकेश प्रकाश सोनवणे, सुनील धुडकू पाटील आणि धीरज सुनील पाटील यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोड रेजमधून वाढणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!