प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची ज्ञानयात्रा संपन्न
अमळनेर : विक्की जाधव.
दि. २० फेब्रुवारी २०२६ स्थानिक प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सहलीत ११ विद्यार्थी तसेच विभागप्रमुख प्रो. डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, सहा. प्रा. के. पी. बागुल आणि किशोर सोनवणे सहभागी झाले.

विद्यार्थ्यांनी त्रिरश्मी लेण्या, दादासाहेब फाळके स्मारक (चित्रनगरी) तसेच गंगापूर धरण या महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देत इतिहास, साहित्य, संस्कृती आणि पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विभागप्रमुखांनी या स्थळांचे आंतरराष्ट्रीय, ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितले.
या ज्ञानयात्रेमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील मर्यादित माहितीपलीकडे जाऊन प्रत्यक्ष निरीक्षणाची संधी मिळाली. कला, साहित्य, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध रोजगारसंधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहल प्रमुख म्हणून डॉ. कल्पना पाटील यांनी समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. प्राचार्य एच. डी. जाधव यांनी अशा सहली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे मत व्यक्त केले. सहलीनंतर सर्व विद्यार्थी सुरक्षित परतले असून त्यांनी हा अनुभव ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.