अमळनेर हादरले! सोशल मीडियाच्या जाळ्यात नामवंत सर्जन डॉक्टरला घातला गंडा
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून सोशल मीडियावरून शेअर बाजार आणि क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीचे आमिष दाखवत शहरातील नामवंत सर्जन डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ते शहरातील प्रतिष्ठित नर्मदा मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक आहेत. या घटनेमुळे अमळनेरमध्ये खळबळ उडाली असून “सायबर गुन्हेगारांचे जाळे किती खोलवर पसरले आहे?” हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
‘फ्रेंड रिक्वेस्ट’पासून कोट्यवधींच्या आमिषापर्यंतचा सापळा लाभा चा लोभ असा काही की.. २९ जानेवारी २०२६ रोजी सोशल मीडियावर ‘झांसी प्रवीण पाटील’ नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर हा प्रकार सुरू झाला. ‘फॉरेक्स इंटरनॅशनल ट्रेडिंग’ आणि ‘सोलोनी’ नावाच्या मोबाईल ॲपची माहिती देत सुरुवातीला ७० हजार रुपये गुंतवायला सांगण्यात आले. काही दिवसांतच १ लाख ५३ हजारांचा आभासी नफा दाखवत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर १० टप्प्यांत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा भरण्यास सांगण्यात आले. ॲपमध्ये ३ कोटी ९१ लाखांहून अधिक नफा दिसू लागल्यानंतर पैसे काढण्यासाठी ‘२० टक्के व्हेरिफिकेशन फी’ म्हणून ६५ लाख ३१ हजार रुपये भरण्याची अट घालण्यात आली. मात्र पैसे न मिळाल्याने अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
जळगाव सायबर पोलिसांची चतुराई; ७० लाख गोठवले, उर्वरित रकमेच्या मागावर
दरम्यान, तक्रार मिळताच परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत जळगाव सायबर पोलिसांनी तातडीने संबंधित बँक खात्यांवर तांत्रिक कारवाई केली. त्यांच्या चतुराईमुळे सुमारे ७० लाख रुपये गोठवण्यात यश आले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे आणि समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणामुळे “ऑनलाईन नफ्याच्या गोड आमिषांपासून सावध राहा, अनोळखी लिंक आणि ॲपवर विश्वास ठेवू नका”