June 30, 2025 12:11 am

क्रिकेट साठी नवीन नियम लागू..

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘मेलबर्न क्रिकेट क्लब’ कडून क्रिकेटबाबतचे नियम तयार केले जातात. या संस्थेनं बॉल टाकन्याआधी ‘रन आऊट’ करणे (‘मंकडिंग) सह इतर नव्या नियमांना मान्यता दिली आहे. त्यानुसार आता एखाद्या बॅटरला ‘मंकडिंग’ पद्धतीनं आऊट केल्यास, ते खेळ भावनेच्या विरोधात मानले जाणार नाही. येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमाची काटेकोर अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे बॉलरने बॉल टाकण्यापूर्वीच ‘नॉन स्ट्रायकर’ला असणाऱ्या फलंदाजांना क्रिस सोडताना हजार वेळा विचार करावा लागणार आहे.

आणखी एक बदल..

क्रिकेटच्या नियम क्रमांक 18.11 मध्येही ‘एमसीसी’ने बदल केलाय. त्यानुसार एखादा फलंदाज झेलबाद झाला नि कॅच घेण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी रन काढताना स्ट्राईक बदलली, तरी फरक पडणार नाही. नवा फलंदाजच स्टाईकवर राहिल. मात्र, ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फलंदाज कॅच आऊट झाल्यास हा नियम लागू नसेल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) ‘द हंड्रेड’ लीगमध्ये या नियमाची अंमलबजावणी केली होती.

बॉलला लाळ लावण्यास बंदी:

‘एमसीसी’ ने बॉलला लाळ किंवा घाम लावण्यावर बंदी घातलीय. कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा नियम लागू केला होता. ‘एमसीसी’ने आता त्याला कायमस्वरूपी मान्यता दिलीय. या प्रकारामुळे खेळात बदल करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला जात असल्याचे ‘एमसीसी’चे म्हणणे आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!