June 30, 2025 9:26 pm

471 महिलांची आरोग्य तपासणी:महिला दिनाच्या औचित्य साधून रोटरी क्लब भिगवण चा उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

471 महिलांची आरोग्य तपासणी:महिला दिनाच्या औचित्य साधून रोटरी क्लब भिगवण चा उपक्रम

(निलेश गायकवाड)

आज जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ भिगवन, ग्रामीण रुग्णालय भिगवन तसेच उपकेंद्र तक्रारवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने व प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या सहकार्याने महिला आरोग्य शिबिर पार पडले.
याचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, व अंगणवाडी मदतनीस आणि शैक्षणिक दृष्ट्या नेहमीच तत्पर असणाऱ्या सर्व महिला शिक्षिका तसेच अहोरात्र लोकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच कार्यरत असणाऱ्या पोलीस महिला अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील सर्व महिला भगिनी यांची तपासणी करण्यात आली. तसेच सर्वांना ग्रामीण रुग्णालय भिगवन तर्फे मोफत औषधे व गोळ्या देण्यात आले तक्रारवाडी उपकेंद्र अंतर्गत हिमोग्लोबिन रक्तातील साखर व उच्च रक्तदाब चेकअप करण्यात आले. रोटरी क्लब यांच्या वतीने आलेल्या महिलांना सोळाशे सॅनेटरी नॅपकिन पॅड वाटण्यात आले
कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून सौ.सारिका मामी भरणे तसेच सौ ऍडव्होकेट स्वाती गिरंजे, सौ सारिका नानी बंडगर, हेमाताई माडगे, वंदनाताई शेलार, रेखाताई पाचांगणे, रजनीताई भिसे,तसेच ग्रामीण रुग्णालय मधील डॉ.सूर्यवंशी निकिता,डॉ.मृदुला जगताप, उपस्थित होत्या. बोलताना सौ सारिका मामी भरने म्हणाल्या की आता महिलांनी पूर्वीसारखे चूल अन मुल एवढेच न पाहता पुरुषाला खांद्याला खांदा लावून आपले अस्तित्व दाखवून द्यावे त्यासाठी काही मदत लागली तरी आम्ही कधीही द्यायला तयार आहोत. सौ ऍडव्होकेट स्वाती गिरंजे यांनी महिलांबद्दल कायदा व सुव्यवस्था याचे मार्गदर्शन केले व डॉ.मृदुला जगताप समुदाय आरोग्य अधिकारी डॉ निकीता सूर्यवंशी यांनी महिलांचे आरोग्य बद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल सर्व माहिती दिली.. कार्यक्रमाचे नियोजन… रोटरीच्या फर्स्ट लेडी रेखा खाडे, सेक्रेटरी सुषमा वाघ, अश्विनी शेंडगे, वैशाली बोगावत, दिपाली भोंगळे, मीनाताई बंडगर, निशिगंधा कुदळे, अश्विनी गांधी, ताहेमिन शेख, सारिका सवणे, , आशा चौधरी, जयश्री चौधरी, नीलिमा बोगवत, पूजा हुलगे, शुभांगी रायसोनी, शारदा कांबळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली बोगावत यांनी केले तसेच आभार सौ. सुषमा वाघ यांनी मानले.. कार्यक्रमासाठी सर्व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता यामध्ये साधारणता 471महिलांची तपासणी करून लागणारी औषधे देण्यात आली..
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जयश्री चौधरी यांच्या टीमने खूप सुंदरआशी रांगोळी काढून सहकार्य केले.
यावेळी रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष संजय खाडे , नियोजित अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. लोखंडे,भिगवण पोलिस स्टेशनचे API दिलीप पवार साहेब माजी अध्यक्ष संपत बंडगर, महेश शेंडगे, संतोष सवाने, रियाज शेख, प्रा.तुषार क्षीरसागर, प्रवीण वाघ, सचिन बोगावत,संजय रायसोनी, किरण रायसोनी, सनी शेलार उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!