युवा उद्योजक विजय दादा भुसनर यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे
भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा उद्योजक आणि आमदार प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले पैलवान विजय हरी भुसणर यांची सार्थ निवड करण्यात आली.
पैलवान विजय भोसले हे आमदार प्रशांत परिचारक आणि पांडुरंग परिवाराचे एक कट्टर आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी शिरढोण येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पद महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद आणि सध्या त्यांची सलग दुसर्या वेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत त्यांच्या या सोलापूर जिल्हा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.