“स्वच्छ शहर – सुंदर शहर” संकल्पनेतून अमळनेरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम

अपनी भाषा में पढ़े! Translate

“स्वच्छ शहर – सुंदर शहर” संकल्पनेतून अमळनेरमध्ये विशेष स्वच्छता मोहीम

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी व्हावे या उद्देशाने अमळनेर नगर परिषदेच्या वतीने “स्वच्छ शहर सुंदर शहर” या संकल्पनेतून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील बस स्टँड परिसरासह प्रमुख सार्वजनिक ठिकाणी आज राबविण्यात येणारी ही मोहीम नगर परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष परीक्षित बाविस्कर  व उपाध्यक्ष प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व नगरसेवकांच्या सक्रिय सहभागातून पार पडणार आहे. संबंधित प्रभागांतील मुकादम, स्वच्छता कर्मचारी व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचा या मोहिमेत मोलाचा सहभाग राहणार आहे.

नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे सविस्तर नियोजन करण्यात आले असून, आरोग्य विभाग व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा व्यापक उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये बस स्टँड परिसर, सार्वजनिक रस्ते, चौक, नागरिकांची वर्दळ असलेली ठिकाणे तसेच इतर महत्त्वाच्या भागांमध्ये साफसफाई, कचरा संकलन व निर्मूलनासोबतच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी रोटरी परिवारानेही पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवला असून, हा सामाजिक सहभाग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.विशेष म्हणजे, ही स्वच्छता मोहीम राजमाता जिजाऊ यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य, न्याय व राष्ट्रहिताचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असून, स्वच्छता, शिस्त व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याने, सर्व अमळनेरकरांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!