पोकळी लगेच भरून निघते…
चव्हाण साहेब ही व्हाण तुम्हीच सांभाळा !
एक बोडारे गेला म्हणून शिवसेना खिळखिळी झाली, असे वृत्त एका पेड वाहिनीने दिले. काल कल्याण कोळसेवाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एका क्षणात ही पोकळी भरून निघाली. विज्ञानाचा एक नियम आहे की, ती लगेच पोकळी भरून काढते.
बोडरेसारख्या सारख्या नेत्यांना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पक्षाला मानणारे मतदार निवडून देतात. त्यांना डोक्यावर बसवतात. आणि हे नेते स्वतःला स्वयंभू समजून दुसऱ्या पक्षात जाऊन त्या लोकांच्या कानात मुततात. नव्हे निष्ठेची विष्ठा करतात. आपल्या भाग्यविधात्या पक्षाचा घात करतात.
पक्ष यांना नगरसेवक, विरोधी पक्ष नेतेपद,
सभागृह नेते पद, इतकेच नव्हे तर उपमहापौरपदा पर्यन्त नेतो, हे कमी म्हणून तीन वेळा आमदारकीची उमेदवारी, पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख पद देतो, एकाच घरात तीन तीन नगरसेवक देतो त्या पक्षाशी गद्दारी करताना यांना लाज कशी वाटत नाही ?
गेली तीस वर्षे सर्व पदे उपभोगली, आर्थिक लाभ घेतले, त्याने ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपात उडी मारली, यांत त्याचा निव्वळ वैयक्तिक स्वार्थच आहे. याला जर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नसती तर हा कधीच शिंदे गटात गेला असता. पक्ष नेतृत्वाने डोळे बंद करून ठेवलेल्या विश्वासाचा महाघात केला. अश्या बेईमान व्यक्तीस भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाने प्रवेश देऊन पाप आपल्या पदरात घेतले. हे पाप भाजपला घेऊन बुडणार आहे. ज्या प्रभागात भाजपाशी दोन हात केले, त्याच प्रभागात भाजपशी हात मिळवणी करणारा हा घात करणार नाही ? याची काय गॅरंटी?
प्रभागातील जनतेला बोडारे बंधुचा नकली व स्वार्थी चेहरा दिसला आहे. निलेश बोबडे सारख्या भाजपनिष्ठ कार्यकर्त्यावर केलेले अत्याचार तेथील मतदार विसरलेले नाहीत. नरेंद्र राजानी, जय कल्याणी, कै. गोटया पाटकर, हरेश कृष्णानी सारखे अनेक कट्टर भाजपा कार्यकर्ते या प्रभागात आहेत, ते या उपऱ्याचे ओझे आपल्या खांद्यावर घेऊन मिरवतील हे कसे शक्य आहे ? संपूर्ण प्रभागातील सर्व जागा म्हणे बोडारेला देणार आहेत, मग ज्यांनी आयुष्यभर भाजपासाठी कष्ट केले, निष्ठेने सक्रिय राहिले, ते काय बोडारेच्या सतरंज्या उचलतील का ? याचा विचार भाजपने करायला हवा. मग या प्रभागातील शिंदे सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी बोडरेच्या घरी भांडी घासायची का ?
मुळात धनंजय असो की चंद्रकांत बोडारे असो त्यांनी अनुक्रमे भाजपा व शिंदे सेना का गाठली. चंद्रकांत बोडरेचा विषय जुना झाला. परंतु हा धनंजय बोडारे, ज्याला लोक आदराने वा त्यांच्याच आग्रहामुळे आबा म्हणत त्याने केसाने गळा का कापला हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
सरिता खानचंदाणी आत्महत्येतील एक संशयित आरोपी म्हणून धनंजय बोडारेवर गुन्हा दाखल आहे. तीन दिवसापूर्वी याच प्रकरणातील एक संशयित आरोपी राज चांदवणीचे अपील उच्च न्यायालयात नामंजूर झाले. त्यामुळे घबराट झालेल्या बोडारेची नकली निष्ठा गळून पडली. आयुष्यभर माल खाल्ला, फळं चाखली आणि एका गुन्ह्यातील अटकेच्या भीतीने याची पाचावर धारण बसली. कुठे गेली ती निष्ठा व आईची उपमा?
कृष्णा देसाई हत्येतील कारावास भोगलेले, मिसामध्ये कारवास भोगलेल्या शिवसैनिकांनी कधीच असा विचार केला नाही. त्यात आनंद दिघे साहेबांपासून साबीरभाई शेख, आमचे रमेश मुकणे असे किती तरी सैनिक आहेत. माझ्यावर शिंदे गटातील एकाने खोटा गुन्हा दाखल केला तर मी पळून न जाता खुद्द पोलीस ठाण्यात पहाडासारखा हजर राहून पोलिसांना आव्हान दिले की मला अटक करा. वरील पैकी कोणीही अटक टाळण्यासाठी विष्ठा केली नाही.
शिवसेना नेते संजय राऊत यांचे आदर्श उदाहरण आहे. ते 100 दिवस कारागृहात राहिले परंतू पक्ष सोडण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही म्हणून आज संजय राऊत हे निष्ठावंतांचे आदर्श आहे. चिक्की घोटाळ्यात अडकवलेले सुरज चव्हाण हे देखील असेच उदाहरण सांगता येईल. संजय राऊत यांनी अशी शरणागती पत्करली असती तर ते केंद्रात मंत्री असते.
आणि आमचे हे रणछोडदास बोडारे अटक टाळण्याबरोबर आपले नगरसेवक पद व राजकीय वाटचाल सुरू ठेवण्यासाठी भाजपावासी झाले.
जास्तीत जास्त काय झाले असते, अटक होऊन जामीनवर सुटले असते. परंतु तेव्हढीही झळ सोसण्याची यांची तयारी नव्हती. उद्या भाजपात जाऊनही हे पराभूत झाले तर भाजपाला टांग देऊन ते शिंदे सेनेत जाणार नाहीत, याची काय गॅरंटी ? भाजपला हा तोहफा मुबारक.
चव्हाण साहेब ही व्हाण तुम्हीच सांभाळा. आमची शिवसेना बोडारे मुक्त केल्याबद्धल आपले सतशः आभार 
दिलीप मालवणकर
9822902470