आदर्श माध्यमिक विद्यालयात किचन शेडचे उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

आदर्श माध्यमिक विद्यालयात किचन शेडचे उद्घाटन

(निलेश गायकवाड)

शाळेसाठी किचन शेड म्हणजे शालेय पोषण आहारासाठी स्वयंपाक करण्यासाठी बनवलेली एक रचना होय. यामध्ये स्वयंपाकघराजवळ पुरेशी जागा असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाळ्यातही काम करता येईल आणि अन्न स्वच्छ राहील. महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनेक शाळांमध्ये किचन शेड उभारण्यासाठी अनुदान आणि नियमावली देखील तयार केली आहे. याच माध्यमातून साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण या विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या किचन शेडचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे ,अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे ,इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे , भिगवण गावचे प्रथम नागरिक सरपंच गुराप्पा पवार, पत्रकार निलेश गायकवाड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके पल्लवी वाघ यांचेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!