अमळनेरच्या कायापालटची शपथ माजी आमदार शिरीष चौधरींचा शब्द! मतदारांमध्ये उत्सुकता
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर पवन चौक येथे झालेल्या कॉर्नर सभेत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिलेल्या जोरदार भाषणाने प्रभाग क्रमांक 10 सह संपूर्ण शहरात चर्चेची जोरदार लाट उसळली आहे. “जनतेने साथ दिली तर अमळनेर शहराची कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही!” असा धडाकेबाज शब्द देत त्यांनी जनतेसमोर विकासाची स्पष्ट सूत्रे मांडली. अनेक वर्षे शहराचा विकास ठप्प असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आश्वासनाच्या राजकारणाला फटके मारत प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचा मुद्दा ठामपणे मांडला.
चौधरी यांनी डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीला पाठबळ देताना म्हटले की, “उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेचे, कोणावरही चिखलफेक न करणारे नेतृत्व अमळनेरला आवश्यक आहे.” डॉक्टर बाविस्कर हे केवळ डॉक्टर नसून शहराच्या विकासासाठी अहोरात्र उपलब्ध राहणारे जिद्दी अभ्यासक असल्याचे ते म्हणाले. शहरात काही मंडळींनी निर्माण केलेल्या “नंदुरबार-जळगाव” चर्चा केवळ दिशाभूल करणाऱ्या असून, कामावर बोला… नेतृत्वावर बोला! अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. “कामात कोण कमी पडतं हे या शहरातील जनतेला चांगलं माहिती आहे,” कोरोना काळात शिरीष चौधरी ने केलेली काम ही जनता विसरणार नाही आणि घरी बसणाऱ्यांना तर मुळीच नाही. असा टोला ही त्यांनी मारला.
या सभेला प्रभाग क्रमांक 10 मधून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे सभा ऐतिहासिक ठरली. चौधरी यांच्या भाषणाने मतदारांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, शहराला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले. “डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना नगराध्यक्ष बनवल्यास आणि शिवसेनेची सत्ता आल्यास अमळनेरची कायापालट जबबाबदारी माझी असेही ते म्हटले.