पोलीस दलातील ‘अजातशत्रू’ व्यक्तिमत्व – सहा. समादेशक सुनिल सरोदे यांचा निवृत्त PI गायकवाड यांच्याकडून गौरव
निलेश गायकवाड)
एसआरपीएफ गट क्र. ५ चे सहाय्यक समादेशक सुनिल सरोदे हे माणूस नसून माणसातला ‘देवमाणूस’ आहे, अशा शब्दांत निवृत्त पोलीस निरीक्षक व्ही. एस. गायकवाड यांनी त्यांचा गौरव केला आहे.
दि. २० ऑगस्ट रोजी निवृत्त पोलीस निरीक्षक गायकवाड हे वैयक्तिक कामानिमित्त एसआरपीएफ गट क्र. ५, दौंड येथे आले असता त्यांनी सहाय्यक समादेशक सुनिल सरोदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात हितगुज झाले.
यावेळी दैनिक लोकनेता प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड म्हणाले, “मी नोकरीत सरोदे साहेबांपेक्षा सिनिअर आहे. मात्र आजही सरोदे साहेबांचा मनमिळाऊ स्वभाव कायम आहे. नोकरीच्या काळात संबंध आलेल्या प्रत्येकाशी त्यांनी प्रेमाने, आपुलकीने नाती जपली आहेत. जवानांपासून ते निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला ते मदतीचा हात देतात.”
“त्यांच्याकडे कोणीही कोणतेही काम घेऊन आले तरी ते कसलाही विचार न करता निस्वार्थपणे मदत करतात. म्हणूनच गट क्र. ५ मध्ये ते ‘अजातशत्रू’ म्हणून ओळखले जातात. पोलीस शिपाई ते सहाय्यक समादेशक असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास हा त्यांच्या कार्याचीच पावती आहे,” असेही गायकवाड यांनी सांगितले.