माजी आयकर सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१ आणि २२ ऑगस्टला भव्य सोहळा.
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाचा राज्यस्तरीय ‘सामाजिक पुरस्कार’ माजी आयकर सहआयुक्त (E.D.) उज्ज्वलकुमार चव्हाण यांना, तर ‘राजकीय (पुरोगामी) पुरस्कार’ मिरा-भाईंदर मनपाचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ ऑगस्ट रोजी आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पडणाऱ्या या दोन दिवसीय सोहळ्यात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप व वितरण सोहळा
२२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पारलिंगी समाज अभ्यासक व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.
पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे
लाल टोपी, बागायतदार रुमाल, रु. २१,०००/- रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर
स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहे
1) अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली
२)मानवी बुद्धीला आव्हान: समजदारीचे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे?
३)शिक्षण आहे, पण मती, नीती आणि गती कुठे आहे?
४)पुन्हा खेड्याकडे चालावे का?
५)लोकशाहीचा वेध : प्रश्न विचारण्याची शक्ती की शांततेची सक्ती?
६)बदलता समाज आणि बदलते कायदे
स्पर्धेचे
परीक्षक म्हणून : जळगावचे प्रा. राजेंद्र देशमुख, धरणगावचे कविवर्य बी. एन. चौधरी आणि अमळनेरचे प्रा. रमेश माने काम पाहणार आहे
स्पर्धेचे पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत
प्रथम – रु. ११,०००/-, द्वितीय – रु. ९,०००/-, तृतीय – रु. ७,०००/-
दिली जाणार आहेत तर
प्रत्येकी रु. २,०००/- ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत
ततेच विजेत्यांना स्मृतीचिन्ह व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत
या वैचारिक सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.