अमळनेर पत्रकार संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी; तालुका कार्यकारिणी जाहीर

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260820-WA1202

अमळनेर पत्रकार संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी; तालुका कार्यकारिणी जाहीर

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या अमळनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी तालुकाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सखाराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार वसंतराव मुंडे आणि कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकारांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणीत विक्की जाधव यांची उपाध्यक्षपदी, भूषण चौधरी यांची सचिवपदी, किरण सूर्यवंशी यांची कार्याध्यक्षपदी, तर परेश चौधरी यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदीप लोहार, भूषण कोळी, गणेश पाटील आणि मनोज चित्ते यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणी अशी :

रवींद्र मोरे — तालुकाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष

विक्की जाधव — उपाध्यक्ष

भूषण चौधरी — सचिव

किरण सूर्यवंशी — कार्याध्यक्ष

परेश चौधरी — संघटक

संदीप लोहार — सदस्य

भूषण कोळी — सदस्य

गणेश पाटील — सदस्य

मनोज चित्ते — सदस्य

पत्रकारांच्या विविध समस्या व प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या हक्क व हितासाठी प्रभावीपणे आवाज उठविणे, तसेच अमळनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार अधिक मजबूत करणे, यासाठी नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार आहे. बदलत्या काळातील डिजिटल मीडिया, पत्रकारिता क्षेत्रातील आव्हाने आणि स्थानिक जनहिताच्या प्रश्नांवर संघटितपणे भूमिका मांडण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची अमळनेर तालुक्यातील संघटनात्मक वाटचाल अधिक गतिमान व बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!