प्रशासनाची वाट न पाहता नेताजींच्या पुतळ्याची स्वच्छता; शहरातील तरुणाईने दिला राष्ट्रनायकाला अनोखा सलाम

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260820-WA1151

प्रशासनाची वाट न पाहता नेताजींच्या पुतळ्याची स्वच्छता; शहरातील तरुणाईने दिला राष्ट्रनायकाला अनोखा सलाम.

 

अमळनेर : विक्की जाधव.

स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अमळनेर शहरातील पुतळ्याची दुरवस्था आणि परिसरातील अस्वच्छता पाहून सामाजिक कार्यकर्ते विजय धनराज पाटील व त्यांच्या सहकारी तरुणांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबविली. परिसरात स्वच्छतेचा अभाव, तुटलेली विद्युत रोषणाई तसेच सायंकाळपर्यंत पुष्पहारही अर्पण न झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

या तरुणाईने हातात झाडू घेत पुतळा परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर नेताजींच्या पुतळ्याचा जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. “स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचा सन्मान करणे ही प्रशासनाची मर्जी नसून राष्ट्रधर्माची जबाबदारी आहे,” अशी भूमिका विजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. या स्वयंस्फूर्त सेवाकार्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, नेताजींसारख्या राष्ट्रनायकांच्या स्मृतीस्थळांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि तुटलेल्या विद्युत व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी विजय पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. राष्ट्रपुरुषांना केवळ जयंती-पुण्यतिथीला अभिवादन करण्यापेक्षा त्यांच्या स्मृतींचा सन्मान प्रत्यक्ष कृतीतून जपला गेला पाहिजे, असा संदेश या सेवाकार्यातून देण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!