दिल्लीत महाराष्ट्राच्या कृषी विभागाला राष्ट्रीय पुरस्कार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सर्वत्र कौतुक
(निलेश गायकवाड)
पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र कृषी विभागाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून या यशाचे श्रेय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गतिशील नेतृत्वाला दिले जात आहे.
दि. 24 व 25 ऑगस्ट रोजी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये होणाऱ्या PMFME कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी हिताचे निर्णय, महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि PMFME योजनेची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राज्यात आतापर्यंत 39,786 प्रकल्प मंजूर झाले, त्यापैकी 17,686 प्रकल्प एकट्या महिला उद्योजकांचे आहेत.
या योजनेतून 80 लाखांहून अधिक रोजगार आणि 3,835 कोटींची गुंतवणूक निर्माण झाली असून 745 कोटींचे अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्राच्या या कामगिरीची दखल घेत अभिनंदन केले आहे.
भरणे यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात देशात अव्वल ठरला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.