भिगवण पोलीस स्टेशनची नवी इमारत तयार, पण उद्घाटन रखडले – आत कुत्र्यांचा वावर

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-19 at 3.10.44 PM

भिगवण पोलीस स्टेशनची नवी इमारत तयार, पण उद्घाटन रखडले – आत कुत्र्यांचा वावर
लाखो खर्चून उभी राहिलेली इमारत धूळ खात, नागरिक संतप्त


(निलेश गायकवाड)

भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे:
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनची नवी इमारत पूर्ण होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने या इमारतीत अद्याप कामकाज सुरू झालेले नाही.

दिमाखदार दिसणारी ही इमारत सध्या रिकामीच आहे. “महाराष्ट्र पोलीस – भिगवण पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण” अशी पाटी लावूनही आतून मात्र शुकशुकाट आहे.

नागरिकांमध्ये नाराजी
इमारतीचे काम पूर्ण होऊनही सुरुवात का होत नाही, उद्घाटन कशामुळे रखडले आहे? असा प्रश्न आता भिगवण आणि परिसरातील नागरिकांना पडला आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्गामुळे भिगवणला नव्या पोलीस स्टेशनची गरज होती. ती तयार असूनही सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

इमारतीत कुत्र्यांचा वावर
सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे, लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीत आणि परिसरात आता भटके कुत्रे ठाण मांडून बसले आहेत. देखभाल नसल्याने इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.

स्थानिकांनी मागणी केली आहे की, प्रशासनाने राजकीय उद्घाटनाची वाट न पाहता तातडीने या इमारतीत पोलीस स्टेशनचे कामकाज सुरू करावे. अन्यथा तयार झालेली सरकारी मालमत्ता अशाच प्रकारे नासाडीला बळी पडेल.

प्रशासनाकडून याबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!