स्वातंत्र्य दिनानिमित्त मंतरवाडीतील 3 गॅरेज मालकांकडून निवारा बालगृहातील मुलांसाठी अन्नदान
सामाजिक बांधिलकीचे कौतुकास्पद उदाहरण
—(निलेश गायकवाड)
जामखेड :
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंतरवाडी येथील 3 व्यावसायिकांनी एकत्र येऊन निवारा बालगृह आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवला.
या उपक्रमात शंकर गॅरेज, ज्योतिर्लिंग गॅरेज आणि एस के पेंटिंग – जाधव या तीन संस्थांनी सहकार्य केले. स्वातंत्र्य दिनी बालगृहात ध्वजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी चविष्ट आणि पौष्टिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
बालगृहाच्या वतीने शंकर गॅरेज, ज्योतिर्लिंग गॅरेज आणि एस के पेंटिंग – जाधव यांच्या सामाजिक कार्याचे आभार मानण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
“स्वातंत्र्याचा खरा आनंद इतरांना आनंद देऊनच मिळतो” असे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळते.
मंतरवाडीतील या तिन्ही व्यावसायिकांच्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.