मदनवाडीत ३१ व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-20 at 1.42.36 PM

मदनवाडीत ३१ व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

(निलेश गायकवाड)

मदनवाडी, ता. इंदापूर : मदनवाडी (हनुमान मंदिर) ता. इंदापूर, जि. पुणे येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१ व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

दि. २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा सप्ताह होणार असून या सप्ताहाचे मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज पहाणे (मदनवाडी) आणि भागवतकार ह.भ.प. कोंडीराम महाराज नाटकर (माजलगाव) हे आहेत.

दैनंदिन कार्यक्रम :
अखंड वीणा नामस्मरण, काकडा भजन पहाटे ४ ते ६, भागवत कथा सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते ५, हरिपाठ सायं. ५ ते ६, हरिकीर्तन रात्री ७ ते ९, महाप्रसाद रात्री ९.३० वा. आणि हरिजागर रात्री ११ ते २.

कीर्तनसेवा :
– शुक्रवार दि. २२/०८ : ह.भ.प. शिवाजी महाराज शेळके
– शनिवार दि. २३/०८ : ह.भ.प. किरण महाराज हराळे (वैरागपूर)
– रविवार दि. २४/०८ : ह.भ.प. गणेशानंद महाराज धुमाळ (देशमुखवाडी)
– सोमवार दि. २५/०८ : ह.भ.प. आकाश महाराज गरगडे (मिरटेकर)
– मंगळवार दि. २६/०८ : ह.भ.प. सागर महाराज बोराटे (सर, नातेपुते)
– बुधवार दि. २७/०८ : ह.भ.प. श्री. अमोल महाराज सुळ (सर) (मोरोची)
– गुरुवार दि. २८/०८ : ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज पहाणे (मदनवाडी)
– शुक्रवार दि. २९/०८ : काल्याचे कीर्तन – ह.भ.प. अक्षय महाराज उगले (अहिल्यानगर)

या सप्ताहासाठी सकाळचे अन्नदाते म्हणून विविध मान्यवरांनी सहकार्य केले असून संध्याकाळच्या महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते श्री. जालिंदर आवासो ढवळे, श्री. विठ्ठल शंकर देवकाते, श्री. बाळासाहेब नारायण बंडगर, श्री. सुरेश दत्तात्रय ढवळे, श्री. राजेंद्र नामदेव देवकाते हे आहेत.

समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, मदनवाडी यांच्या वतीने भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!