करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- ग्लोबल फाउंडेशन करमाळा संचलित ‘पवार जनरल हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा येथे एका भव्य मोफत ऑर्थोपेडिक व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदरचे शिबीर हे शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत पवार जनरल हॉस्पिटल, बस स्टँडजवळ, करमाळा, जि. सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
तसेच या शिबिरात नामांकित आणि अनुभवी डॉक्टरांद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. डॉ. पाटील विश्वजीत विजय (MBBS, MS Orthopaedics) – गुडघा व खुबा बदल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार, ट्रॉमा कॅम्प आदींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. राऊत अविनाश (MBBS, D.Orthopedic) – हाडांचे उपचार, सांधेदुखी, सायटिका, फ्रॅक्चर व मणक्याचे आजार यांवर उपचार करणार असून डॉ. राऊत श्वेता (BDS) – रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, दात व हिरड्यांच्या विविध समस्यांवर तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
पवार जनरल हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत (CM Relief Fund) उपचारांची सुविधा, कॅम्पसमध्ये सीटी स्कॅन (CT Scan), ऑटोमॅटिकपॅथॉलॉजी लॅब, सुसज्ज आयसीयू (ICU), अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डिजिटल एक्स-रे, फिजियोथेरेपी व पुनर्वसन सुविधा तसेच २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहेत. तरी वरील सर्व शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पवार जनरल हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.