मदनवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम – डिव्हायडरमध्ये वृक्षारोपणास सुरुवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-20 at 12.28.26 PM

मदनवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम – डिव्हायडरमध्ये वृक्षारोपणास सुरुवात

(निलेश गायकवाड)

मदनवाडी, ता. इंदापूर : मदनवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावच्या विकासात भर टाकणारा एक सुंदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सरपंच सौ. अश्विनी बंडगर, ग्रामसेवक विजय साळुंखे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने मदनवाडी हद्दीतील मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या वृक्षारोपणामुळे केवळ पर्यावरणाचे संवर्धन होणार नसून गावच्या मुख्य चौकाचे आणि रस्त्याचे सुशोभीकरणही होणार आहे. येणाऱ्या काळात ही झाडे मोठी झाल्यानंतर मदनवाडीचा परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर दिसणार आहे.

ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही घेतली असून नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होऊन झाडांचे संरक्षण करावे, असे आवाहन सरपंच अश्विनी बंडगर यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे मदनवाडी ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!