नगरसेविका वंदना युवराज भदाणे यांना अपात्र घोषित करा
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांची मागणी
उल्हासनगर : प्रतिनिधी
उल्हासनगर महानगरपालिकेत प्रभाग क्र. ३ ब मधून निवडून आलेल्या नगरसेविका सौ. वंदना युवराज भदाणे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे, असा दावा करीत माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी नगरसेविका वंदना युवराज भदाणे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोग, आयुक्त, उल्हासनगर महानगर पालिका, कोकण विभागीय आयुक्त, यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.
सौ. वंदना युवराज भदाणे ह्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रात आपल्या राहण्याची पत्याची खोटी माहिती दिली होती. तसेच शौचालया बाबत खोटे प्रमाण पत्र दिले होते. त्या स्वतः एका खाजगी शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका असून त्यांचे पती युवराज भदाणे हे उल्हासनगर महानगर पालिकेत क्लास २ अधिकारी होते, त्यांचे वार्षिक उत्पन्न २० लाखाच्या वर
असून स्थावर व जंगम मालमत्ता कोट्यावधीची असताना ते सार्वजनिक शौचालायचा नियमित वापर करतात, असा खोटा दाखला दि. २३/१२/२०२६ रोजी मिळवला होता. वास्तविक भदाणे परिवार कल्याण प. येथील आलिशान कोणार्क हाईट्स च्या १२०१ / १२०२ फ्लॅटमध्ये राहतो. असे असताना उल्हासनगर कॅम्प १ येथील बॅरेक चा एका रूम मध्ये राहत असल्याची दिशाभूल करणारी माहिती नामनिर्देशन पत्रात शपथेवर दिली होती. अशी माहिती मालवणकर यांनी पुराव्यानिशी दिली आहे.
या बाबतीत मालवणकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, वंदना भदाणे यांनी दि. २५ /१२ / २०२५ रोजीच्या नामनिर्देशन पत्रासोबत एक आधारकार्ड व रेशन कार्ड देऊन वरील पत्ता दर्शवला असला तरी आय डी बीआय बँक, कल्याण प. च्या शाखेत त्याच दिवशी दि. २५ /१२/२०२५ रोजी उघडलेल्या खात्यात कोणार्क हाईट्स, कल्याण प. चा पत्ता नोंदवलेला आहे. कोणतीही बँक के वाय सी करताना आधारकार्ड वरील पत्ताच पासबुकवर नमूद करते. याचा अर्थ नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या आधारकार्ड व्यतिरिक्त अजून एक आधारकार्ड असावे,