दौंडमधील नगरमोरी या वर्दळीच्या ठिकाणी मिळाले शिर नसलेले धड, अवघ्या बारा तासातच आरोपींना जेरबंद करण्यात यश.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – संत मदर टेरेसा चौक नगरमोरी परिसरातील आर बी 1 येथे एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा अतिशय निघृण पणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे सदर आरोपींनी महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचे शीर धडापासून वेगळे केले आणि अज्ञात ठिकाणी फेकून दिले आहे. त्यामुळे मयत महिलेचे शिर शोधण्याचे मोठे आव्हान दौंड पोलिसांसमोर आहे.पोलिसांनी घटनेच्या बारा तासातच दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबुली देखील दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पत्रकारांना दिली.परंतु खुनाचे कारण विचारले असता खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. यामधे
सुमन किसन शिंदे (वय 70, रा. आर.बी. 1 दौंड) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव समजते आहे.
याप्रकरणी मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे (रा. रामलिंग रोड, शिरूर, पुणे) यांनी फिर्याद दिली.
विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट (वय 26, रा. समता नगर, दौंड) व प्रसाद बाबुलाल चव्हाण (रा. आर बी 1, नगर मोरी, दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
धारदार शस्त्राने महिलेच्या गळ्यापासून शिरच्छेद करून खून केला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शीर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले. दौंड पोलीस स्टेशन तसेच पुणे जिल्हा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र तपास पथके तयार करून जलद तपास यंत्रणा द्वारे आरोपींना अटक करण्यात आली. खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले त्यांनी पाहिले असता त्यांना महिलेचे शिर नसलेले धड आढळून आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, ज्ञानेश्वर राऊत तसेच पोलीस कर्मचारी आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे , नितीन बोराडे, धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमिर शेख , किरण पांढरे, महेंद्र लोहार, पवन माने, सोमनाथ चौंडे, निखिल पवार, हजारे, अक्षय कुंभार, ओमनाथ तुमकुटे, तांबोळी या पथकाने कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत.