स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारोळा तालुका अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील
अमळनेर : विक्की जाधव.
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, जळगावचे अध्यक्ष श्री. देवेंद्रजी देशमुख यांच्या शिफारशीनुसार श्रीमती भाग्यश्री पाटील यांची पारोळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने पारोळा तालुक्यात महासंघाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी तसेच समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी भाग्यश्री पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे कार्य तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासह संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
भाग्यश्री पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी स्वाभिमानी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.