प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांचा विजय निश्चित!
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकच घोषणा घुमू लागली आहे “सुवर्णाताईंचा विजय अटळ आहे!” अनेक वर्षे समाजमाध्यमांपासून प्रत्यक्ष समाजकारणापर्यंत अविरत सेवा देणारे चंद्रकांत उर्फ पिंटू भाऊ चौधरी यांच्या कार्याचा ठसा आज प्रभागातील प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतो. त्यामुळे सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांच्या उमेदवारीनंतर प्रभागातील वातावरण अचानक उत्साहाने तापले असून, मतदारांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर अभूतपूर्व विश्वास दाखवला आहे.

पिंटू भाऊ चौधरी यांनी वर्षानुवर्षे सामाजिक प्रश्नांवर केलेली धडपड, संकटाच्या काळात दिलेला हात आणि गरजूंसाठी २४ तास उपलब्ध असलेली त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांचा जनसंपर्क केवळ राजकीय नव्हे तर हृदयाशी जोडलेला आहे. या मजबूत जनाधाराचा थेट फायदा सुवर्णाताईंना मिळत असून, घराघरात होणाऱ्या संवादातून, महिलांमधून मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादातून आणि तरुणांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक लाटेमुळे हा विजयाचा पाया अधिकच भक्कम झाला आहे.
सध्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकतर्फी वातावरण तयार होत असून मतदार खुलेपणाने सांगू लागले आहेत “या वेळेस सुवर्णाताईंचाच विजय शंभर टक्के!” विरोधकांकडे मुद्दे नाहीत, तर सुवर्णाताईंकडे विश्वास, कार्य आणि लोकांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे प्रभागात निर्माण झालेली सुवर्णलाट दिवसेंदिवस अधिक प्रबळ होत असून 2025 च्या निकालात प्रभाग 10 सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांच्या नावाने झळकणार, याबाबत मतदारांमध्ये पूर्ण शाश्वती दिसून येत आहे.