अनेक वर्षापासून प्रभागासाठी झटणाऱ्या सामान्य कुटुंबाला मिळणार न्याय किरण भाऊ बहारेचं निवडून येणार नागरिक देताय हमी 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अनेक वर्षापासून प्रभागासाठी झटणाऱ्या सामान्य कुटुंबाला मिळणार न्याय किरण भाऊ बहारेचं निवडून येणार नागरिक देताय हमी 

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या धामधुमीत प्रभाग क्रमांक 3 हा सध्या संपूर्ण शहराच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. प्रभागात एकच नाद घुमतोय “किरण भाऊ बहारे जिंकणारच!” नागरिकांमध्ये निर्माण झालेली ही प्रचंड सकारात्मक हवा पाहता किरण भाऊ बहारे उर्फ कृष्णा रामसिंग बहारे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. परिसरात दैनंदिन भेटीपासून ते रात्रौ उशिरापर्यंत चालणाऱ्या संपर्कसभांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचं गणित बिघडल्याचं स्पष्ट दिसत आहे.

प्रभागातील नागरिकांच्या विविध स्तरांमधून मिळणारा पाठिंबा हा केवळ राजकीय नसून भावनिकही आहे. अनेक वर्षे प्रभागासाठी सातत्याने केलेली धडपड, सर्वसामान्यांच्या अडचणींना प्राधान्य देऊन केलेल्या मदतीचा वारसा आणि “पहिले काम मग गाजावाजा” या ठाम भूमिकेमुळे किरण भाऊ बहारे यांची प्रतिमा ‘खऱ्या अर्थाने जनतेचा नेता’ अशी बनली आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान दरवाजे ठोठावताच लोक स्वतःहून बाहेर येऊन म्हणत आहेत “या वेळेस किरण भाऊंचाच विजय!”

आजवर शांत असलेले अनेक मतदारही किरण भाऊ बहारे यांना खुल्या मनाने पाठिंबा देत असल्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणूक सरळसरळ एकतर्फी होत असल्याचे चित्र तयार झाले आहे. विरोधकांकडे ना मुद्दे उरले, ना जनतेत विश्वास; उलटपक्षी नागरिक स्वतः पुढे येऊन हाक देत आहेत  “किरण भाऊ बहारे, विजय तुमचाच निश्चित!” प्रभागातील बदलाची आस आणि विकासाचा निर्धार या दोन्ही गोष्टी मतदार एकमुखाने किरण भाऊंकडे पाहत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!