आदर्श ग्रामपंचायत गोपाळवाडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र सोनवलकर तर भा.प.संघ शहर अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – दौंडच्या पंचक्रोशीतील आदर्श ग्रामपंचायत गोपाळवाडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र मनोहर सोनवलकर यांची तर उपाध्यक्षपदी सदाशिव रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्षम सरपंच स्वातीताई राजू पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेमध्ये ही निवड करण्यात आली, नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र सोनवलकर म्हणाले की आदर्श व तंटामुक्त गाव म्हणून ओळख असणाऱ्या गोपाळवाडी गावातील तंटे हे गावातच मिटवले जातील तसेच शैक्षणिक सामाजिक कामेसुद्धा यामागे सुद्धा करत आलो आहे यापुढेही काम करत राहणार यावेळी ग्रामपंचायत अधिकारी झुंबर होळकर उपसरपंच मनिषा ताई भोसले माजी सरपंच गोरख होले माजी सरपंच वैशालीताई शिंदे माजी सरपंच रोहिणी ताई शिंदे माजी सरपंच जयसिंग दादा दरेकर, माजी चेअरमन बाळासाहेब गिरमे, शांताराम होले, माजी उपसरपंच प्रवीण होले, प्रकाश गिरमे,शरद होले,सुरज भुजबळ, पोलीस पाटील वर्षाताई लोणकर, राजू पवार, विजय लव्हे, शिवाजी दरेकर, रघु सुळ, विजय होले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, निलेश शेंडे, डॉ.दत्तात्रय जगताप, अँड किशोर टेकावडे,अक्षय भोसले, लखन शेंडे, आप्पा पवार,गणेश चोरमले यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.