ज्यांनी केला राजकीय प्रवास सुखकर त्यांचाच केला घात तुतारीच्या खांद्यावर ठेऊन हात सोईस्कर केली आपली वाट प्रभाग 16 मध्ये चर्चेला उधाण 

अपनी भाषा में पढ़े! Translate

ज्यांनी केला राजकीय प्रवास सुखकर त्यांचाच केला घात तुतारीच्या खांद्यावर ठेऊन हात सोईस्कर केली आपली वाट प्रभाग 16 मध्ये चर्चेला उधाण 

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 अवघ्या दोन दिवसांवर येत असताना प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय चर्चांचा जोर सुटतांना पाहायला मिळत आहे. मतदारांच्या मनात अनेक तर्क–वितर्क, शंका–कुशंका आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ‘कोण जिंकणार, कोण हरणार’ या चर्चांनी गल्लीबोळ राजकीय वातावरण तापले आहेत. सुरुवातीला दोन प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरून नंतर स्वतःचा अर्ज मागे घेत पत्नीला महिला प्रवर्गातून रिंगणात उतरवण्याच्या निर्णयामुळे रवी पितांबर पाटील यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते.

मात्र या सर्व हालचालींनंतर प्रभागातील राजकीय समीकरणांनी अनपेक्षित वळण घेतले आहे. शिवसेनेच्या सुभाष शिंपी या अधिकृत उमेदवारामुळे आपली मते कमी होऊ नयेत म्हणून रवी पाटील यांनी अनेकांची भेट घेऊन त्यांच्या स्वतःच्या तब्येतीचे कारण पुढे करत मध्यस्थी करून माघार घेण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. ह्या डावपेचाला ‘विजयाचा पहिला टप्पा’ असे बरेचजण म्हणत असले तरी या नीतीमागे अंतर्गत राजकारणाचा मोठा खेळ दडलेला असल्याच्या चर्चा तापल्या आहेत.

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,  प्रभागात प्रचारादरम्यान तुतारीच्या खांद्यावर ठेवला हात आणि मित्रपक्ष सोबतच मतदारांचा केला घात.. ज्यांनी राजकीय वाटचाल मोकळी करून तुमचा प्रवास सुखकर केला त्याच त्याच शिवसेना पक्षालाच कळत–नकळत दगा केल्याची चर्चा प्रभागभर रंगली आहे.

“तुतारीच्या खांद्यावर ठेवला हात आणि मित्रपक्षालाच केला घात” अशी चर्चा मतदारांमध्ये जोर धरण्यास सुरुवात झाली असून या घटनेमुळे मतदारांच्या भावनांनाही मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये रवी पितांबर पाटील यांच्याविरोधातील नाराजी शिगेला पोहोचली असून या नाराजीची झळ निवडणुकीच्या निकालात दिसणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!