प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा नेतृत्वाचा जोरदार उदय; सुयोग धनगरांना मिळतोय युवा महिलां पुरुष सर्वच प्रवर्गातून प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 12 मध्ये युवा नेतृत्वाचा जोरदार उदय; सुयोग धनगरांना मिळतोय युवा महिलां पुरुष सर्वच प्रवर्गातून प्रतिसाद

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुयोग ज्ञानेश्वर धनगर. तरुणाईच्या नेतृत्वाला प्रचंड साथ मिळत असून प्रभागातील युवक, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून सुयोग भाऊंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या साधेपणाचा, समर्पित वृत्तीचा आणि प्रामाणिक दृष्टिकोनाचा नागरिकांवर मोठा प्रभाव पडत आहे.

नाना धनगर यांच्या सेवाभावाचा ठसा प्रभागात सुयोग भाऊंची विश्वासार्ह ओळख

कोरोना काळात नाना धनगर यांनी केलेल्या लोकसेवेची उज्वल परंपरा आणि त्याच घरातील सुयोग धनगर यांचे नेतृत्व यामुळे प्रभागात विश्वासाची मजबूत पायाभरणी झालेली दिसते. जनतेच्या प्रत्येक समस्या जवळून ओळखून त्यावर उपाय शोधण्याची सुयोग भाऊंची पद्धत प्रभागातील नागरिकांना भावते आहे. तरुण असूनही परिपक्व निर्णयक्षमता, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि सर्व घटकांना सोबत घेण्याचा स्वभाव त्यांना इतर उमेदवारांपासून वेगळं उभं करतो.

प्रभागात ‘युवांना संधी’ असा जनतेचा एकमुखी सूर; सुयोग धनगरांचा विजय निश्चितच असल्याचे चित्र

निवडणूक जवळ येत असताना प्रभाग 12 मध्ये एकच चर्चा जोर धरतो आहे “युवा नेतृत्वाला संधी द्या!” विकास कामे, स्वच्छ प्रशासन आणि सर्वसमावेशक विचारसरणी या आधारावर नागरिक मोठ्या प्रमाणावर सुयोग भाऊंच्या पाठीशी उभे राहात आहेत. घराघरांत सुरू असलेल्या चर्चांमध्ये, गल्लीगल्लीत होणाऱ्या संवादात आणि तरुणांच्या ग्रुपमध्ये एकच नाव वारंवार ऐकू येते सुयोग धनगर! ज्या पद्धतीने उत्स्फूर्त जनसमर्थन मिळत आहे, त्यावरून प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुयोग धनगरांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!